● शहरासाठी अभिमानास्पद कामगिरी; भाजपाचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी स्पर्धकांचे केले कौतूक. 

 तसेच भविष्यात पिंपरी-चिंचवड शहरातही आयर्न मॅन स्पर्धा भरवून स्पर्धकांना अंतराष्ट्रीय स्पर्धेसाठी पुरक वातावरण तयार केले जाईल तसेच अधिकाधिक खेळाडू तयार व्हावे अशी सदिच्छा माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी दिली. 

पिंपरी, दि. १७( punetoday9news):- कझाकिस्तान येथे झालेल्या स्पर्धेत जगभरात प्रतिष्ठेची समजली जाणारी आयर्न मॅन या स्पर्धेमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील अमित लोंढे, वैभव ठोंबरे व स्वप्निल चिंचवडे यांनी ही स्पर्धा जिंकून शहराचे नाव या जगविख्यात स्पर्धेमध्ये कोरले आहे.

या स्पर्धेत संपूर्ण जगभरातील असंख्य स्पर्धक भाग घेतात पण ही स्पर्धा जिंकणारे काही निवडक स्पर्धक असतात.

आयर्न मॅन स्पर्धेचे स्वरूप असे असते.

स्पर्धेची वेळ १६ तास

पोहणे : 3.8 किलोमीटर 

सायकल चालविणे : 180 किलोमीटर 

धावणे : 42 किलोमीटर

त्यामुळे ही स्पर्धा जिंकणे हे फार कठीण मानले जाते.  ही स्पर्धा जिंकून आल्यानंतर या तिन्ही स्पर्धकांचे भाजपाचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख माजी नगरसेवक शंकर जगताप, माजी पक्षनेते नामदेव ढाके, सामाजिक कार्यकर्ते माऊली जगताप, संजय मराठे, सुनील देवकर, योगेश चिंचवडे यांच्याकडून शाल व पुस्तक देऊन गौरवण्यात आले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!