पुणे, दि. १७( punetoday9news):-  महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत योजनांचा लाभ घेण्याकरिता वय वर्षे १८ ते ६० वयोगटातील कामगारांनी मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. इमारत व इतर बांधकामाच्या व्याख्येत २१ कामांचा समावेश करण्यात आलेला आहे.

ऑनलाईन नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

■ छायाचित्र ओळख पुराव्यासाठी आधारकार्ड,पारपत्र ,वाहनचालक परवाना,पॅनकार्ड ,मतदान ओळखपत्र यापैकी एक.
■ रहिवासी पुराव्यासाठी आधारकार्ड, पारपत्र,वाहनचालक परवाना, शिधापत्रिका,मागील महिन्याचे वीज देयक,ग्रामपंचायत दाखला यापैकी एक.
■ वयाबाबतचा पुरावा आधारकार्ड,पारपत्र,वाहनचालक परवाना,पॅनकार्ड,जन्माचा दाखला,शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र यापैकी एक. (पूर्ण जन्मतारीख नमुद असणे आवश्यक)
■ स्वयंघोषणापत्र.
■ आधार संमतीपत्र
■ मागील वर्षात ९० किंवा अधिक दिवस काम केल्याबाबत नियोक्त्याचे, ग्रामसेवक, महानगरपालिका ,नगरपालिकाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
■ बँक पासबुकची छायांकित प्रत

आरोग्य योजना

■ नोंदित लाभार्थी स्त्री व पुरुष बांधकाम कामगारांच्या पत्नीस दोन जिवीत अपत्यांपर्यंत नैसर्गिक प्रसुतीसाठी १५ हजार रुपये व शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी २० हजार रुपये एवढे आर्थिक सहाय्य.

■ लाभार्थी कामगार व त्याच्या कुटूंबियांना गंभीर आजाराच्या उपचारार्थ १ लाख रुपये एवढे वैद्यकीय सहाय्य.

■ नोंदीत लाभार्थी कामगार अथवा त्याच्या पती किंवा पत्नीने एका मुलीच्या जन्मानंतर कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे १८ वर्षापर्यंत १ लाख रुपये मुदत बंद ठेव

■ नोंदित लाभार्थी कामगारास ७५ टक्के किंवा कायमचे अपंगत्व आल्यास त्यास २ लाख रुपये एवढे आर्थिक सहाय्य. तथापि, नोंदीत बांधकाम कामागाराचे विमा संरक्षण असल्यास, विमा रक्कमेची प्रतिपूर्ती अथवा मंडळामार्फत २ लाख रुपये आर्थिक सहाय्य यापैकी कोणताही एक लाभ अनुज्ञेय.

■ व्यसनमुक्ती केंद्रांतर्गत उपचाराकरीता ६००० रुपये अर्थसहाय्य.

बांधकाम कामगारांनी अधिक माहितीसाठी नोंदणी ,नुतनीकरण,लाभाचा अर्ज करण्याकरिता https://mahabocw.in या संकेतस्थळाचा वापर करावा.

तसेच अपर कामगार आयुक्त, बंगला क्रमांक-५, मुंबई-पुणे रोड, शिवाजीनगर पुणे- ५, दू. क्र. – ०२०-२५५४२६११ येथे संपर्क साधावा.

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!