रायगड, दि.१८ ( punetoday9news):-  रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर आणि भरडखोल या पर्यटनस्थळी समुद्रात दोन संशयास्पद बोटी आढळून आल्या . या बोटींमध्ये एके 47 रायफल सापडल्यानं परिसरात खळबळ उडाली होती . त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली . मात्र पोलिसांनी अधिक केलेल्या चौकशी नंतर ती बोट ओमान देशातून भरकटली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 

त्या बोटीवर असलेल्या स्टीकर व नोंदणी क्रमांकावरून ती युके मध्ये नोंदणी केली असल्याचा अंदाज बांधला जात आहे. मात्र तत्पूरी अचानक मिळालेल्या या बोटी मधील हत्यार व काडतुसांमुळे सर्वत्र रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तर विधानसभेत या विषयी माहिती देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की “ती एका ऑस्ट्रेलियन नागरिकाची आहे . हाना लॉडर्सगन असं या ऑस्ट्रेलियन नागरिकाचे नाव असून ती एक महिला आहे . तीचे पती जेम्स हार्बट हे या बोटीचे कप्तान आहेत . ही बोट मस्कतहून युरोपकडे जाणार होती . मात्र , बोटीचे इंजिन बिघडल्याने बोटीवरील सर्वांना रेस्क्यू करण्यात आले . तसेच समुद्र खवळला असल्याने बोटीचे टोईंग करता आले नाही . त्यामुळे ती बोट रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर आली ” .

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!