विरारमध्ये एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच तीन मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात तिच्या मैत्रिणीचाही समावेश आहे.

याप्रकरणी विरार पोलिसांनी तिच्या मैत्रिणीसह तीन जणांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. पीडित मुलगी १२ वर्षाची असून ती विरारमध्ये राहते. मंगळवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास मोबाईल दुरुस्त करण्यासाठी ती बाहेर निघाली होती. त्यावेळी तिची मैत्रीण तिला भेटली. आपण फिरायला जाऊ असे सांगून तिने तिला विरार पूर्वेच्या साईदत्त नगर येथील निर्जन ठिकाणी नेले. या ठिकाणी तिच्या मैत्रिणीचे तीन मित्र हजर होते. या तीन मित्रांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यावेळी तिची मैत्रीणही तिथे हजर होते. रात्री दीडच्या सुमारात ही घटना घडली असून त्यांनी मुलीला पहाटे ५ वाजता घरी सोडले.

दरम्यान, या प्रकरणी विरार पोलिसांनी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पीडित मुलीची मैत्रीण तसेच लाला, शुभम सिंग, आणि प्रतीक सिंग या चौघांवर पोक्सो तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल केला. तसेच विरार पोलिसांनी विशेष पथके तयार करून ६ तासांच्या आत पीडित मुलीच्या मैत्रिणीसह दोन आरोपींना अटक केली. हे सर्व आरोपी सज्ञान असून २० ते २२ वर्ष वयोगटातील आहे. यातील एक आरोपी भाजी विक्रेता आहे. तर एक जण महाविद्यालयातील विद्यार्थी आहे. यातील लाला नावाच्या आरोपीवर अमली पदार्थाचा गुन्हा दाखल आहे. तो फरार असून त्याला लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली.

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!