सांगवी, दि. १९( punetoday9news):- औध हाॅस्पिटल परिसरात श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने वाल्मिकी पंचायत मित्र मंडळाच्या वतीने महर्षी वाल्मिकी यांच्या मंदिराला सुंदर फुलांची सजावट करण्यात आली.
मागील दोन वर्षां मध्ये कोरोनाचे सर्व नियम पाळून हा उत्सव छोट्या प्रमाणात साजरा करण्यात आला होता. या वर्षी शासनाने निर्बंध उठवल्यामुळे मोठ्या उत्साहात उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी निशान यांची पूजा करण्यात आली. वीर गोगादेव भजन कीर्तन करण्यात आले तर रात्री १२ वाजता श्रीकृष्ण भजन व जन्मोत्सव मोठ्या आनंद उत्साहात नाचत गात साजरा करून आलेल्या सर्व भाविकांना प्रसाद देण्यात आला.
त्याप्रसंगी माजी नगरसेवक धनराज बिर्धा, संजय गांधी निराधार योजनेचे संजय मराठे, सामाजिक कार्यकर्ते पंकज सारसर, कार्याध्यक्ष सत्यवान ग्यानी अध्यक्ष किशोर लालबेगी, उपाध्यक्ष राजेंद्र खेराले, महासचिव राजबाबू सरकनिया,सचिव सतीश चंडालिया, सहसचिव हिरा वाघेला, खजिनदार राजू बेद आधी मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed