पिंपळे गुरव, दि. २० ( punetoday9news):-  पिंपरी चिंचवड शहरातील पीएमपीएमएलचे कंट्रोलर कम चेकर काळुराम लांडगे यांना महाराष्ट्र राज्याचा गुणवंत कामगार पुरस्कार प्रदान करण्यात आला त्याबद्दल भाजपाचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी सन्मानित केले.

चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्यालयामध्ये काळुराम लांडगे यांना माजी नगरसेवक व भाजपा चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे संजय मराठे, सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत जगताप उपस्थित होते.

लांडगे ३५ वर्षे पीएमपीएमएल सेवे मध्ये कार्यरत असून सध्या कंट्रोलर कम चेकर म्हणून काम करत आहेत. तसेच कित्येक प्रवाशांची मदत केली आहे. तसेच अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे  त्यामुळे लांडगेंसारख्या प्रामाणिक कर्मचाऱ्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे शंकर जगताप म्हणाले.

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!