मुंबई, दि. २२( punetoday9news):- विधिमंडळाच्या कामकाजामध्ये प्रश्न विचारताना छगन भुजबळ यांनी आरोग्य मंत्री सावंत यांना प्रश्न विचारला की लोकांच्या त्रासाला कमी करण्यासाठी प्रशासनाने किती डास पकडले यापैकी नर डास किती व मादी डास किती? नर व मादी डास यापैकी अधिक संहारक डास कोणते? याची माहिती द्यावी त्यामुळे हा प्रश्न विचारल्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला. उपस्थित आमदार पोट धरून हसले.
यावर आरोग्यमंत्र्यांनीही उत्तर देताना म्हटले की याबाबत लवकरच मी माहिती घेऊन पटलावर ठेवतो.
किती डास पकडले?
त्यापैकी किती नर व किती मादी डास होते?
अधिक संहारक कोण, मादी डास की नर डास?
🤣🤣🤣 pic.twitter.com/uBWASWyeWI— Shrimant Mane (@ShrimantManey) August 22, 2022
यात नर डास जास्त धोकादायक आहेत की मादी डास धोकादायक आहेत. डासांच्या विच्छेदनाचे अहवाल प्राप्त झाले आहेत का ? याचा व्हीसेरा उपलब्ध आहे का ? अशा मिश्किल प्रश्नाने काही वेळ सभागृहात एकच हशा पिकला.
पालघर जिल्ह्यात हत्तीरोगाचा वाढता प्रभाव पाहता शासनाने काय उपाययोजना केली यावर लेखी उत्तरात सरकारने निवडक भागातील डास पकडून त्याचे वर्गीकरण केले , विच्छेदन केले , व डास घनता काढली असे उत्तर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आज सभागृहात दिले .
या उत्तरानंतर माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या खास शैलीत सावंत यांना कोंडीत पकडले.
Comments are closed