पुणे, दि. २४( punetoday9news):- पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात कमी जाडीचे प्लास्टिक व नॉन ओव्हन प्लास्टिकचा साठा केला जात असल्याची तक्रार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे प्राप्त झाली होती . त्या अनुषंगाने पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडील अधिकारी यांनी (दि. २२/८) रोजी चुनीलाल बन्सीलाल कोचेटा , नाना पेठ , पुणे- ०२ याठिकाणी असणारे गोडाऊन सील केले .
याठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदी असलेले कमी जाडीचे प्लास्टिक व नॉन ओव्हन प्लास्टिकचा साठा आढळून आला आहे . आत्तापर्यंत सदर ठिकाणाहून अंदाजे ५.५ टन प्लास्टिक जप्त करण्यात आले असून संपूर्ण गोडाऊन सील करण्यात आले आहे . संबंधीत गोडाऊन मालका विरुद्ध दंडात्मक कारवाई करून रु .५००० / – दंड वसूल करण्यात आला आहे .
सदरील कारवाईच्या वेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडील प्रताप जगताप , उप प्रादेशिक अधिकारी , सुषमा कुंभार , क्षेत्र अधिकारी , रेखा तोगरे , क्षेत्र अधिकारी , पुणे महानगरपालिकेकडील डॉ . केतकी घाटगे , सहाय्यक आरोग्य अधिकारी , घनकचरा व्यवस्थापन , इमामुद्दिन इनामदार , प्रमुख आरोग्य निरीक्षक राजेश रासकर , आरोग्य निरीक्षक व शाहू पोकळे , आरोग्य निरीक्षक इ . अधिकारी उपस्थित होते .
Comments are closed