पुणे, दि. २५ ( punetoday9news):- जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था , भवानी पेठ , पुणे आणि शिक्षण विभाग ( प्राथ . ) पुणे महानगरपालिका आयोजित समग्र शिक्षा योजनेच्या समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत अध्ययन अक्षम असलेल्या बालकांच्या शैक्षणिक गरजा व उपचारात्मक अध्यापन कौशल्य याची माहिती होण्यासाठीची दोन दिवसीय कार्यशाळा दिनांक २३ व २४ ऑगस्ट रोजी पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृह , घोले रोड , पुणे येथे संपन्न झाली .
कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ . मनोरमा आवारे , प्रकल्प अधिकारी , समग्र शिक्षा , शिक्षण विभाग ( प्राथ . ) पुणे महानगरपालिका यांनी केले . डॉ . मिनाक्षी राऊत , प्रशासकीय अधिकारी , शिक्षण विभाग ( प्राथ . ) पुणे महानगरपालिका यांनी करोना काळातील विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून येण्याकरिता सदर कार्यशाळा उपयुक्त असल्याचे प्रतिपादन केले . तसेच डॉ . शोभा खंदारे , प्राचार्य , जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था , भवानी पेठ , पुणे यांनी समावेशित शिक्षण उपक्रमाची अंमलबजावणी शिक्षकांनी शाळास्तरावर प्रभावीपणे करावी याबाबत मार्गदर्शन केले . सदर कार्यशाळेसाठी डॉ . अंजली मॉरिस फौंडेशन , पुणे यांचेकडील तज्ञ मार्गदर्शक मेधा पाठक , मुग्धा सफई , मंजुषा कुलकर्णी व आदिती मोघे यांनी अध्ययन अक्षम बालकांसाठी त्याचे प्रकार आणि स्क्रीनिंग प्रोसेस , मूल्यमापन प्रक्रियेचा आढावा व उपचारात्मक शिक्षण इत्यादी बाबींवर मार्गदर्शन केले .
पुणे महानगरपालिकेचे उपप्रशासकीय अधिकारी , सहाय्यक प्रशासकीय अधिकारी , पर्यवेक्षक व मनपा प्राथमिक व माध्यमिक शाळेतील एकूण २४७ शिक्षक उपस्थित होते . समग्र शिक्षा , समावेशित शिक्षण पुणे महानगरपालिका कार्यालयाचे समन्वयक , विशेष साधनव्यक्ती व विशेष शिक्षक यांनी परिश्रम घेतले .
Comments are closed