*योजनेचे स्वरुप*
कुटुंबातील पहिल्या जीवंत अपत्यापर्यंत महिलेला ५ हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य.

*योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक बाबी*
■ लाभार्थी व पतीचे आधारकार्ड
■ लाभार्थीचे आधार संलग्न बँक खाते
■ गरोदरपणाची शासकीय आरोग्य संस्थेत १५० दिवसांचे आत नोंद
■ शासकीय संस्थेत गरोदर कालावधीत तपासणी
■ बाळाचे जन्मनोंदणी दाखला व प्राथमिक लसीकरण प्रमाणपत्र
■ या व्यतिरिक्त जननी सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शासकिय संस्थेमध्ये तसेच शासन मान्य रुग्णालयात बाळंतपण झाल्यास या योजनेचे मिळणारे आर्थिक सहाय्य देखील देय राहील.

*लाभाचे स्वरूप*
■ गरोदरपणाची १५० दिवसाच्या आत नोंदणी झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात १ हजार रुपये.
■ सहा महिन्यानंतर परंतु गरोदरपणात किमान एक तपासणी झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात २ हजार रुपये.
■ बाळाचे जन्मनोंद प्रमाणपत्र तसेच १४ आठवड्यापर्यंतचे प्राथमिक लसीकरण पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यात २ हजार रुपये.
■ लाभार्थीनी वरील अटींची पूर्तता केल्यानंतर ३० दिवसांच्या आत लाभाची रक्कम अदा करण्यात येते.

संपर्क:
आपल्या कार्यक्षेत्रातील आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्य सेविका किंवा कोणतीही शासकीय आरोग्य संस्था.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!