पिंपरी, दि. २७( punetoday9news):-  पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत आरोग्य व पर्यावरणचे नियम भंग  केल्याबद्दल अजय चारठाणकर, उपआयुक्त, आरोग्य विभाग यांच्या आदेशा नुसार ग्रीन मार्शल पथकांमार्फत सावर्जनिक ठिकाणी उघड्यावर जैववैद्यकीय घनकचरा टाकण्या-या आस्थापानावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यानुसार ग्रीन मार्शल पथकाने पुढीलप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली.

१) धनश्री मेडिकल, पिंपळे सौदागर, दि. २३/०८

२) हेल्थ एक्यूरेट लॅब, पिंपळे सौदागर, दि. २४/०८

३) शाश्वत हॉस्पिटल, औंध, पुणे, दि. २६/०८

यांचे बायोमेडिकल वेस्ट उघड्यावर टाकल्यामुळे  प्रत्येकी ३५०००/- रुपये प्रमाणे एकूण ३ (तीन) आस्थापानावर एकूण दंड रक्कम रुपये १,०५,०००/- (एक लाख पाच हजार फक्त) दंडात्मक कारवाइ करण्यात आली.

या कारवाई मध्ये सहा आरोग्य अधिकारी महेश आढाव.आरोग्य निरीक्षक प्र.आ.नि उमेश जाधव व लिपिक आकाश मडके, मनपा कर्मचारी रवी हटकर, गणेश थरकुडे, MSF जवान दशरथ घुले, महेश कदम,वैशाली कदम व तृतीय पंथीय पथक यांचा समावेश होता.

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!