पुुणे  : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या मामासाहेब मोहोळ कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय अभ्यासक्रम बारावी बोर्ड परीक्षेचे निकाल ९९.०१% टक्के तर पदव्युत्तर विभाग एम.कॉम.भाग- १ परीक्षेचा निकाल १००% टक्के लागल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .बाळकृष्ण झावरे यांनी दिली.

कनिष्ठ महाविद्यालयीकडील बारावी विज्ञान व वाणिज्य शाखेचा निकाल १०० व कला विभागाचा निकाल ९८.३७ टक्के, तर व्यवसाय अभ्यासक्रमामध्ये  ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी व इलेक्ट्रकल टेक्नॉलॉजी या शाखेचा निकाल १०० व इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी चा ९४.१२ टक्के निकाल लागला आहे.
कला शाखेत ढोरे चैतन्य अविनाश ७५.६९ (प्रथम), वाणिज्य शाखेत चव्हाण विशाल भीमा – ७४.७६ (प्रथम) तर विज्ञान शाखेत साळुंखे भागवत नंदकुमार – ६७.३८ (प्रथम), ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजीत वाघ नितीन बबन – ७२.००(प्रथम), इलेक्ट्रकल टेक्नॉलॉजीत सुतार शुभम महेंद्र ७२.०० (प्रथम), इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजीत थिटे विशारद विजय ६४.१५(प्रथम) यांचे अनुक्रमे शाखेनिहाय प्रथम आले आहेत. महाविद्यालयात कला शाखेतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला ढोरे चैतन्य अविनाश ७५.६९ सर्वाधिक गुण मिळवलेले आहेत. हा विद्यार्थी राज्यस्तरीय ॲथलेटिक खेळाडू आहे. आपल्या खेळ सरावाबरोबर अभ्यासात सुद्धा शैक्षणिक प्राविण्य घेत त्याने आपला खेळ जोपासला आहे. मुळशी सारख्या ग्रामीण भागातून खेळ सरावासाठी बाबुराव सणस क्रीडांगण, पुणे येथे येऊन आपल्या अभ्यासात एकाग्रता ठेवली आहे. बोर्ड परिक्षा निकालाची परंपरा वाढविण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयीन अध्यपकांनी जादा तासिका, विशेष तासिका, स्कॉलर बॅच, पालकदत्तक योजना, प्रश्नावली योजना, तज्ञ अध्यापक श्रेणी हे उपक्रम राबविले होते.
एम कॉम परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून ५५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते सर्व विद्यार्थी प्रथम, द्वितीय, तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. पूनम राऊत ही विद्यार्थिनी प्रथम आली असून तिने ८०.२५ गुण प्राप्त केले आहेत.
यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे, संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, अजित पवार , उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, सचिव ऍड .संदीप कदम, खजिनदार ऍड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव आत्मराम जाधव , प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांनी अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

#

Comments are closed

error: Content is protected !!