सांगवी ,दि. २७ ( punetoday9news):- सांगवी येथील स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालया मधे आमदार लक्ष्मण जगताप व माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनात ओम साई फाउंडेशनच्या वतीने भारतरत्न संत मदर तेरेसा यांच्या जयंती निमित्त कर्मचारी दिव्यांग कुणाल भालेराव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले तसेच  उत्कृष्ट सेवेबद्दल डॉक्टरांचा संत मदर तेरेसा हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले.

सांगवी रुग्णालयातील डॉक्टर तृप्ती  सागळे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात सांगवी रूग्णालय डॉक्टर्स व कर्मचारी हे उत्तम प्रकारे नागरिकांची सेवा करतात त्यामुळे डॉ. तृप्ती सागळे व त्यांच्या डॉक्टर सहकाऱ्यांना संत मदत तेरेसा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .

ओम साई फाउंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे म्हणाले, ” डॉक्टर हे आपल्या समाजात देव मानले जातात गोरगरिबांची सेवा करून आपली निस्वार्थी सेवा बजावत असतात त्यामुळे त्यांचा सन्मान करणे हे मी आमचे भाग्य समजतो.”

यावेळी सांगवी रुग्णालयातील  डॉ.तृप्ती मंगेश सागळे जेष्ठ वैद्यकीय अधिकारी , प्रमुख,डॉ.कोकरे श्रध्दा शिवाजीराव वैद्यकीय अधिकारी,डॉ.हांडे किशोरकुमार वसंतराव वैद्यकीय अधिकारी,डॉ.कुंदन प्रशांत पाटील वैद्यकीय अधिकारी,डॉ.नरके गोविंदा महादेव वैद्यकीय अधिकारी,डॉ.तुषार जाधव वैद्यकीय अधिकारी,डॉ.बिरादार सुप्रिया पांडुरंग, वैद्यकीय अधिकारी,डॉ.वर्षा गवई स्त्री रोग तज्ञ,डॉ.सुधीर करवंदे भुलतज्ञ व डॉ.मोहन नलावडे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.शंकर बोरकर,डॉ.मेघा सूर्यवंशी यांना भारतरत्न संत मदर तेरेसा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य व ओम साई फाऊंडेशन चे अध्यक्ष संजय मराठे, प्रकाश बारथे, पंकज सारसर, सचिन अवघडे, रवी खोकर, सामाजिक कार्यकर्त्या सीमा पाटोळे, पुनम यादव तसेच रुग्णालयाचे कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

या प्रसंगी सूत्र संचालन पंकज सारसर यांनी केले तर आभार राजू आवळेकर यांनी मानले.

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!