सांगवी, दि. ३( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी येथील श्री अक्कलकोट स्वामी समर्थ ट्रस्टच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त सर्वपल्ली राधाकृष्ण गौरव सन्मान पुरस्कार २०२२  संजय कणसे व दिपाली कणसे, स्वीकृत नगरसेवक यांच्या हस्ते देण्यात आला.

 

 

यावेळी बादशाह तबस्सुम, नंदा काकडे, प्रीती चव्हाण, शोभा मुळीक , प्रियांका लोमटे, बलभीम भोसले, चंद्रकांत सोनवणे, मयुरा गायकवाड, सिमा घुटे, दिपाली शहारे, विशाल ताकवले, जेनेट माने, संजय साळुंखे यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी संजय कणसे म्हणाले की, “भारतीय समाजात शिक्षकांचे अमुल्य असे योगदान आहे. समाजाची दिशा ठरवणाऱ्या गुरुजनांच सन्मान करणे ही मोठी बाब आहे. शिक्षकांच्या ज्ञानदानाने भारत विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण कामगिरी करत सर्व क्षेत्रात अग्रेसर बनला आहे. ”

तर मुख्याध्यापिका नंदा काकडे यांनीही शिक्षक व विद्यार्थी यांतील गुरू शिष्याच्या परंपरेचे आदर्श नाते विधिध उदाहरणातून सांगितले.  महात्मा फुले, सर्वपल्ली राधाकृष्ण, साने गुरुजी यांनी आपल्या ज्ञानदानाने आदर्श समाज घडवण्याची महत्वपूर्ण भूमिका बजावली असून आज ही समाज विकासाची जबाबदारी आजच्या शिक्षकांची आहे असेही त्या म्हणाल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश मोरे यांनी केले तर आभार शोभा मुळीक यांनी व्यक्त केले.

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!