चिंचवड,दि .४( punetoday9news):- चिंचवड पोलिस स्टेशन हद्दीतील शांतता समिती सदस्य, ग्राम रक्षक दल सदस्य, महिला दक्षता समिती सदस्य ,पोलिस मित्र आणी चिंचवड हद्दीतील गणेश मंडळे यांची संयुक्त बैठक चिंचवड पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी प्रभू रामचंद्र सभागृह चिंचवड येथे आयोजित केली.गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात साजरे करा असे आवाहन चिंचवड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी केले.
या प्रसंगी वाहतूक नियंत्रण शाखा चिंचवड विभागा चे पोलिस अधिकारी अर्जुन पवार, पोलिस उपनिरीक्षक व्यंकट पोटे , सहाय्यक पोलिस निरीक्षक झडते व गणेश भक्त ,गणेश मंडळांचे अध्यक्ष पदाधिकारी, आणि कार्यकर्ते तसेच शांतता समिती सदस्य, ग्राम रक्षक दल सदस्य, महिला दक्षता समिती सदस्य, मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या प्रसंगी शांतता समितीचे सदस्य धनंजय कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. अणि सर्वांनी पोलिस प्रशासनाने पाठीशी उभे राहून सर्वांनी मदतीसाठी उपस्थित राहावे अणि सामाजिक कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन केले.तसेच दरवर्षी प्रमाणे मंडळांनी याही वर्षी चिंचवड पोलिस स्टेशन राबवत असलेल्या मोरया पुरस्कार उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन केले.
गणेश मंडळाचे प्रतिनिधी म्हणून मोरेश्वर शेडगे यांनी रस्त्यातील झाडे, लाईट चे खांब तसेच मिरवणूक इत्यादी बाबत प्रश्न उपस्थित केले तसेच योगेश चिंचवड यांनीही काही सूचना केल्या पार्किंग बाबत काही सूचना केल्या प्रशांत आगद्यान यांनी रस्ते खोदलेले आहेत याबाबत काही प्रश्न उपस्थित केले. महिला दक्षता समितीच्या क्षमा धाडगे यांनी गणेश मंडळांनी भक्ती गीते लावावीत असे आवाहन केले .
वरिष्ठ पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी गणेशाची स्थापना ,दररोजचे कार्यक्रम सुरक्षितता पदाधिकारी सदस्यांनी घ्यावयाची काळजी तसेच सीसीटीव्ही लावणे मूर्तीची काळजी घेणे तसेच विसर्जन मिरवणुकीत घ्यायची काळजी डीजे विरहित अणि गुलाल विरहित मिरवणूक इत्यादींबाबत मोलाचे मार्गदर्शन केले खोदलेले रस्ते विसर्जन मार्ग इत्यादींबाबत मार्गदर्शन करण्यात आले . मंडळांनी वर्षभरात अनेक समाज उपयोगी उपक्रमात सहभागी व्हावे ते राबवावेत असे सांगितले
वाहतूक नियंत्रण शाखा चिंचवड विभाग यांनी पार्किंग व्यवस्था बाबत मार्गदर्शन केले अनेक गणेश मंडळाचे अध्यक्ष कार्यकर्ते यांनी विचारलेल्या प्रश्न शंका यांचे निरसन अधिकाऱ्यांनी केले सुभाष मालुसरे यांनी सर्वांचे आभार मानले
सर्व गणेश मंडळाच्या सदस्यांनी परवाने काढून शांततेत अणि भक्तीपूर्ण वातावरणात उत्सव साजरा करावा असे आवाहन करण्यात आले.
एल आय बी चे सागर आढारी , उभे अणि डी. जी. कांबळे यांनी नियोजन केले .

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!