पुणे दि.३( punetoday9news):- गणेश विर्सजन मिरवणूक निमित्त ९ सप्टेंबर २०२२ रोजी प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पुणे मार्फत शहरातील पाच ठिकाणी सुरू करण्यात आलेले ऑटोरिक्षा मीटर तपासणीचे कामकाज बंद राहणार आहे.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पुणे (पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामती) यांनी खटुआ समितीच्या शिफारशींनुसार तीन आसनी ऑटोरिक्षांकरिता १ सप्टेंबर २०२२ पासून भाडेवाढ लागू केली आहे. त्यामुळे ऑटोरिक्षांचे मीटर पुनः प्रमाणीकरण (मीटर कॅलिब्रेशन) करण्याकरिता ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. ऑटोरिक्षांचे मीटर पुनः प्रमाणीकरण विहित कालमर्यादेत व सुरळीतपणे पुर्ण होण्याकरिता मीटर तपासणी ट्रॅकचे विकेंद्रीकरण करण्यात आलेले असून पुणे शहरात पाच ठिकाणी हे काम सुरू आहे.
तथापी गणेश विर्सजन मिरवणूक निमित्त ९ सप्टेंबर २०२२ रोजी ऑटोरिक्षा मीटर तपासणीचे कामकाज बंद राहणार आहे.ऑटोरिक्षा मीटर तपासणीचे कामकाज १० ऑक्टोबर पासून पुर्वीप्रमाणेच सकाळी ७.०० ते सायंकाळी ४.०० या वेळेत सुरू राहील, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी कळविले आहे
Comments are closed