नवी सांगवी,दि. ४ (punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी, पिंपळे गुरव परिसरात यंदा मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा होताना दिसत आहे. 

कोरोनाच्या संकटानंतर निर्बंध मुक्त गणेशोत्सव असल्याने नागरिकांचीही गणपती सजावट व देखावे पाहण्यासाठी गर्दी होताना दिसून येत आहे.  नवी सांगवीतील चैत्रबन मित्र मंडळ व आई प्रतिष्ठानच्या वतीने यावर्षी गणपतीस सुंदर अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. तसेच लहान मुले ते आबालवृद्धांसाठी मनोरंजनपर सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आले आहे. यामध्ये नृत्य, रांगोळी, चित्रकला, होम मिनीस्टर, संगीत खुर्ची अशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. तसेच मंगळवार दि.६ रोजी गणपतीची विसर्जन मिरवणूक निघणार आहे.

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!