पिंपळे गुरव, दि. ५( punetoday9news):- पिंपळे गुरव, कवडे नगर येथे परंपरेनुसार स्वराज्य प्रतिष्ठाण यांच्या कडून गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
या वर्षी मंडळाने २५ व्या वर्षात पदार्पण केले आहे तरी मंडळाने रौप्य महोत्सवी वर्षी विविध सामाजिक व मनोरंजक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच कार्यसम्राट आमदार लक्ष्मणभाऊ जगताप व माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप यांचा संकल्पनेतून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक व मंडळाचे मार्गदर्शक विजूशेठ जगताप तसेच डॉ.दत्तात्रय गायकवाड यांचा हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास रक्तदात्यांनी चांगला प्रतिसाद देत ५१ जणांनी रक्तदान केले.या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उद्योजक विजूशेठ जगताप यांनी या शिबिराचे कौतुक केले आणि म्हणाले की या मंडळा सारखेच इतर मंडळांनी असे समाज उपयोगी उपक्रम करावे.
कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष साईनाथ नेटके,उपाध्यक्ष सुजित तोडकरी,कार्याध्यक्ष तेजस शेखरे, खजिनदार राहुल देशनेहेरे, सचिव अंकुश दाहिभाते व मंडळाचे कार्यकर्ते अनूप कवडे, आदित्य कवडे, आदित्य जाधव, अभिजीत दळवी, संकेत जाधव, बालाजी कैटकर, तेजस नलावडे, महेश किनिकर, उद्धव कवडे, अशोक कवडे, बबनराव देवकर व बाळासाहेब देवकर तसेच माजी नगरसेवक राजेंद्र राजापूरे, राहुल जवळकर, रवी जाधव, डॉ.देवीदास शेलार, भाऊसाहेब जाधव, संजय मराठे, बंडू टाकवले, सुरेश सकट, विजय मेंकुदळे व नागरिक उपस्थिती होते.
Comments are closed