● ना मोठा केक, ना पिझ्झा- बर्गर, ना माॅल मधील खरेदी,  ना दिखाव्याचा बडेजाव. आपल्या मुलीचा पहिला वाढदिवस हा तिकोना किल्यावर सहकुटुंब गिर्यारोहण करून साजरा.  

● बालवयातच महाराष्ट्रातील अस्मितेची, गौरवशाली इतिहासाची ओळख आपल्या मुलांना व्हावी म्हणून उपक्रम साजरा.

● मुलगी शर्वरी (वय १२महिने) व मुलगा शिवांश( वय ५ वर्षे) या दोघांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनोख्या ट्रेकचे सहकुटुंब आयोजन. 

● सागर झगडे यांची स्वतः गिर्यारोहणाची आवड जपत आत्तापर्यंत तब्बल  ४० हून अधिक किल्यावर गिर्यारोहणाची कामगिरी . 

● तर मुलाचीही वयाच्या अडीच वर्षापासून गिर्यारोहणास सुरूवात. 

 

पिंपरी, ( punetoday9news):- पिंपरी-चिंचवड शहरातील नवी सांगवी येथील सागर झगडे व प्रिती झगडे यांनी आपल्या मुलीचा पहिला वाढदिवस हा मावळातील तिकोना किल्यावर सहकुटुंब ट्रेक करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. 

आजकाल वाढदिवस म्हटलं की मोठा कार्यक्रम, पार्टी, नवीन खरेदी असे जणू समीकरणच बनले आहे. श्रीमंत व्यक्तींच्या अनुकरणातून सामान्य, मध्यमवर्गीय कुटुंबात अनावश्यक खर्च केला जातो. यास फाटा देत महाराष्ट्राची अस्मिता, गौरवशाली परंपरा, पुरोगामी विचारधारा , आरोग्य जनजागृती लोकांमध्ये होण्यासाठी हा उपक्रम राबवला असल्याचे झगडे कुटुंबियांनी सांगितले. 

कोरोना संकटातून आपण गर्दी टाळणे, अनावश्यक खर्च टाळणे, आरोग्याबाबत जागृत होणे गरजेचे आहे तरीही सद्यस्थितीत समाजात या विषयावर गांभीर्याने विचार व वर्तन केले जात नाही. म्हणून अशा प्रकारे वाढदिवस साजरा करून समाजासमोर आदर्श निर्माण करण्याचा हा प्रयत्न केला आहे.

सागर झगडे हे उच्च शिक्षित असून ते पत्रकार, शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आपल्या लेखनीतून सामाजिक प्रबोधन करताना आपण स्वतः त्यावर चालायला हवे अशी पुरोगामी विचारधारा ते जपतात तसेच गिर्यारोहणाचीआवड जपत त्यांनी स्वतः चाळीसहून किल्ले सर केले आहेत. यामध्ये राजगड, लोहगड, तिकोना, वासोटा, कळसुबाई शिखर यासारखी ठिकाणे दोन, तीन पेक्षा अधिक वेळा सर केली आहेत. तर पुणे, सातारा, अहमदनगर भागातील मिळून कित्येक किल्यावर गिर्यारोहण केले आहे.

या गिर्यारोहणादरम्यान पुण्यातील जेष्ठ गिर्यारोहक पुष्पा गोखले ( वय ६९ वर्षे) व शर्वरी (वय १२ महिने) असा बालेकिल्ला चढताना दोन पिढ्यातील एकत्र प्रवासही पहायला मिळाला. तर मुलगा शिवांश( वय ५ वर्षे) यानेही आतापर्यंत लहान मोठे असे १० हुन अधिक ट्रेक केले आहेत.

यावेळी सागर झगडे, संचालक पुणे टुडे ९ न्यूज, पत्नी प्रीती झगडे, संदीप परंडवाल, शिल्पा परंडवाल, नीलम कुदळे, अन्वी कुदळे (वय ६ वर्षे) नील परंडवाल (वय ६ वर्षे) , शौर्य परंडवाल (वय १३ वर्षे) व गिर्यारोहक नीतिन नवले उपस्थित होते.

 




 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!