पिंपरी (punetoday9news): पिंपरी चिंचवड येथील भोसरीतील दिघी रोडवर राहणाऱ्या प्रिती भालेराव-हुंबरे यांनी घरकाम व मुलांना सांभाळून अर्धवट राहिलेले शिक्षण तब्बल १५वर्षानंतर पूर्ण केले. बारावीची परीक्षा देत कला शाखेत उत्तम यश संपादन केले. भोसरी परिसरात वृत्तपत्र वितरण करणारे पती नाथान हुंबरे यांनी मोलाची साथ देत अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण केले आहे.
पतिचा वृत्तपत्र वितरण व्ययवसा त्यात तुटपुंजी कमाई . या परिस्थितीत संसाराचा गाडा किती दिवस ओढायचा ? हा प्रश्न सतावत होता. त्यामुळे पतीच्या वाढदिवसाच्या दिवशी पत्नी प्रितीने आपले राहिलेले शिक्षण पूर्ण करून अनोखी भेट देण्याचा ध्यास घेतला व पुुुढील शिक्षणासाठी नगर जिल्ह्यातील पानेगाव येथील सेंट पॉल विद्यालयात बाहेरून प्रवेश घेतला. घरातील सर्व कामाबरोबर दोन मुलांचा सांभाळ करीत स्वतः अभ्यास केला. अभ्यासातील सातत्य व असणारी रुची यामुळे प्रितीने बारावीला कला शाखेत ७४% गुण मिळवीत विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळविला.
या यशात पती नाथान हुंबरे, भाऊ सागर भालेकर यांनी पुढाकार घेतला असून पुढील शिक्षणासाठी पाठिंबा दर्शवला आहे.
प्रतिक्रिया : प्रिती भालेराव-हुंबरे
– तुटपुंज्या पगारात घरखर्च करणे शक्य नसल्याने व चांगली नोकरी मिळवण्यासाठी शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नव्हता. तसेच परिस्थिती सर्व काही शिकविते. फक्त या परिस्थितीवर मात करण्यासाठी कुटुंबाचा पाठिंबा गरजेचा आहे. मला मिळालेल्या कुटुंबियांच्या पाठिंब्यामुळेच मी यश मिळवू शकले. माझ्यासारख्या अनेक गृहिणी सुद्धा आपलं अर्धवट शिक्षण पूर्ण करू शकतात.त्यांनी आपले शिक्षण जिद्दीने पूर्ण करावे.
Comments are closed