पुणे, दि.२०( punetoday9news):- गुरूवार (दि.२२) रोजी पर्वती MLR टाकी परिसर , पर्वती HLR टाकी परिसर , पर्वती LLR परिसर व चिखली पंपिंग येथील विद्युत , पंपींग विषयक तातडीचे दुरुस्तीचे काम असल्यामुळे सदर भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे .

तसेच शुक्रवार (दि.२३) रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे . तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग

पर्वती MLR टाकी परिसर : – गुरुवार पेठ , बुधवार पेठ , काशेवाडी , क्वार्टरगेट परिसर , गंज पेठ , भवानी पेठ , नाना पेठ , लोहिया नगर , सोमवार पेठ , अरुण वैद्य स्टेडीयम परिसर , घोरपडे पेठ इ .

पर्वती HLR टाकी परिसर : – सहकार नगर , पद्मावती , बिबवेवाडी , मुकुंदनगर काही भाग , महर्षीनगर , गंगाधाम , चिंतामणी नगर भाग १ व २ लेक टाऊन , शिवतेजनगर , अप्पर इंदिरानगर , लोअर इंदिरानगर , शेळकेवस्ती महेश सोसायटी , बिबवेवाडी गावठाण , प्रेमनगर , आंबेडकरनगर डायस प्लॉट , ढोलेमळा , सॅलेसबरी पार्क , गरीधरभवन चौक , ठाकरे वसाहत , पर्वती गावठाण , भाग्योदयनगर , शिवनेरीनगर , मिठानगर , कुमार पृथ्वी , स.नं .४२ कोंढवा खुर्द , साईबाबानगर , इत्यादी .

पर्वती LLR परिसर:-  शहरातील सर्व पेठा , दत्तवाडी परीसर , राजेंद्रनगर , लोकमान्य नगर , डेक्कन परिसर , शिवाजी नगर परिसर , स्वारगेट परिसर .

चिखली पंपिंगवर अवलंबून असणारा भाग:- संजय पार्क , बर्माशेल सोसायटी , पुणे एअरपोर्ट , राजीव गांधी नगर नॉर्थ व साऊथ , यमुनानगर , गणेशनगर ( बोपखेल ) , कळस काही भाग , म्हस्के वस्ती , टिंगरेनगर गल्ली नं . १ ते ६ , एकतानगर झोपडपट्टी , सिध्देश्वर कुमार समृध्दी , प्री पार्क सोसायटी , पराशर सोसायटी , ठुबे पठारे वस्ती , दिनकर पठारे वस्ती .




 

Comments are closed

error: Content is protected !!