योजनेचे स्वरूप
केंद्रशासनाच्या निर्देशानुसार बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी महाराष्ट्र राज्य मंडळाकडून प्राप्त झालेल्या टॉप २० पर्सेंटाईल यादीमध्ये नावे समाविष्ट असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येतो. योजना १०० टक्के केंद्रपुरस्कृत असून महाराष्ट्र राज्यासाठी ७४१७ संच निर्धारित केले आहेत. त्यापैकी अनुसूचित जातीसाठी १५ टक्के, अनुसूचित जमातीसाठी ७.५ टक्के, इतर मागासवर्गीयांसाठी २७ टक्के आणि शारिरीकदृष्ट्या अपंगांसाठी ५ टक्के राखीव आहेत.
योजनेच्या अटी
■अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
■अर्जदार इतर कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचा, स्टायपेंड लाभार्थी नसावा.
■अर्जदाराच्या पालकांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न ८ लाखापेक्षा जास्त नसावे.
■नुतनीकरणासाठी विद्यार्थ्याने मागील वर्षी ५० टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
■ महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती ७५ टक्के असणे आवश्यक आहे.
■विद्यार्थ्यांने कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये स्वतः चे खाते उघडणे आश्यक आहे.
लाभाचे स्वरुप
■पदवी स्तर (३ वर्ष) साठी – प्रतिपर्ष १० हजार रूपये
■पदव्युत्तर पदवी (२ वर्ष) साठी प्रतिवर्ष २० हजार रूपये
■मानव संसाधन विकास मंत्रालय, नवी दिल्ली यांचेतर्फे रक्कम ही विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यावर जमा करण्यात येते.
■ नवीन मंजूरीसाठी तसेच नुतनीकरणासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
■ऑनलाईन अर्ज करण्याचे संकेतस्थळ-www.scholarships.gov.in
अधिक माहितीसाठी संपर्क-शिक्षण संचालक, उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे www.dhepune.gov.in
Comments are closed