सांगवी, दि. २०( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी परिसरात स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान तर्फे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शना खाली गौरी गणपती सजावट स्पर्धा घेण्यात आली.
सहभागी स्पर्धकांनी उत्कृष्ट देखावे सादर केले. चित्रकार ब्रम्हानंद लाहोटी यांनी परिक्षण केले त्यांनी घरगुती सजावटीस जास्त प्राधान्य दिले.
या स्पर्धेच्या बक्षीस समारंभास माजी नगरसेवक अशोक सोनवणे, माजी नगरसेविका शारदा सोनवणे, तृप्ती कांबळे, दिलिप तनपुरे, शाहरुख सय्यद, कृष्णा भंडलकर, हिरेन सोनवणे, संगीता दिक्षित उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:-
घरगुती गौरी सजावट स्पर्धा
१) किरण दैवाल(प्रथम क्रमांक)
२) प्रीती नाईक(द्वितिय क्रमांक)
३) अर्चना राजगुरु(तृतिय क्रमांक)
४) मंगल चौगुले व मंगल हिरवे (चतुर्थ क्रमांक)
घरगुती गणपती सजावट स्पर्धा
१) पराग बोंबले (प्रथम क्रमांक)
२) गायत्री देशपांडे वैद्य (द्वितिय क्रमांक)
३) निर्मला कराळे (तृतिय क्रमांक)
४) रचना बिन्नर (चतुर्थ क्रमांक)
Comments are closed