पुणे, दि. २१ ( punetoday9news):- भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे कार्य केवळ पुण्यासाठी, महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी महत्त्वाचे असून ही एक ऐतिहासिक सेवा आहे. भारतीय संस्कृती प्रसाराला समर्पित ही संस्था आहे, अशा शब्दात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संस्थेचा गौरव केला.




भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतर्फे निर्मित ‘भारत विद्या’ या ऑनलाइन शैक्षणिक व्यासपीठाचे (डिजिटल प्लॅटफॉर्म) श्रीमती सीतारामन यांच्या हस्ते अनावरण झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, माजी खासदार प्रदीप रावत, संस्थेच्या सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष ॲड. सदानंद फडके, कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन, मानद सचिव प्रा. सुधीर वैश्यंपायन आदी उपस्थित होते.

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या १०५ वर्षाच्या कार्यापुढे मी अक्षरश: नतमस्तक झाले आहे अशा शब्दात गौरव करुन श्रीमती सितारामन म्हणाल्या, आपली समृद्ध संस्कृती, तत्त्वज्ञान, नीतितत्वे जगासमोर आणण्याचे काम ही संस्था करत आहे. महाभारत, विष्णूपुराणाच्या प्राचीन प्रतींसह अनेक प्राचीन ग्रंथे येथे जतन करुन ठेवण्यात आले आहेत. इतर कोणत्याही विद्यापीठाशी, संस्थेच्या कार्याशी या संस्थेच्या कार्याची तुलना करता येणार नाही.

आपला देश समजून घ्यायचा असेल तर आपली अनेक शतकांमधील एकता, तत्वज्ञान, समाजशास्त्र, विज्ञान, कला, संगीत, इतिहास आदी समजून घ्यावे लागतील. त्यासाठी भांडारकर संस्थेचे मोलाचे योगदान राहील. साहित्य, ज्ञानाचा वारसा ही आपली संपत्ती असून भांडारकर सारख्या संस्था त्याद्वारे देशाची सेवा करत आहेत, असेही श्रीमती सीतारामन म्हणाल्या.

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!