योजनेचे स्वरुप
रुफटॉप सोलरमुळे घरगुती वीज ग्राहकाला दिवसा निर्माण झालेल्या विजेचा वापर स्वतः करता येईल. यामुळे महाग विजेचे देयक कमी होण्यास मदत होणार आहे. रुफटॉप सोलरद्वारे तयार झालेली अतिरिक्त वीज महावितरणला विकताही येणार आहे व विकलेल्या विजेचा परतावाही मिळतो.

योजनेचा लाभ
या योजेनत घरगुती वीज वापरासाठीच्या ३ किलोवॅट पर्यंत रुफटॉप सोलर प्रकल्पाला लागणाऱ्या खर्चावर केंद्र सरकारतर्फे ४० टक्के अनुदान. ३ ते १० किलोवॅट पर्यंत २० टक्के अनुदान. घरगूती ग्राहकांना ही सवलत १० किलोवॅट पर्यंत लागू. सहकारी गृह निवासी सोसायट्यांनाही ५०० किलोवॅट पर्यंत घरगुती वापरासाठी येणाऱ्या खर्चावर २० टक्के अनुदान.

अर्ज करण्याची पद्धत
https://www.mahadiscom.in/ या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने.

संपर्क: जवळचे महावितरण कार्यालय

 




 

Comments are closed

error: Content is protected !!