खडकी, दि. २३( punetoday9news):-  पुणे  शहरातील खडकी परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असल्याने येथील वाहतूक संथगतीने होत असून याचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. तासनतास चिमुकले ताटकळत स्कूलबस मध्ये बसतात. त्याची दखल प्रशासन घेत नसल्याने विद्यार्थांनी स्वतः च रस्त्यावर उतरून खड्डे बुजवले. 




विद्यार्थी, पालक व नागरिकांना होणारा त्रास,  सतत छोटे-मोठे अपघात पाहून ऑल सेंट्स हायस्कूलचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले व शालेय परिसरातील रस्त्यावरील खड्डे बूजवले.

विद्यार्थ्यांच्या सोबतीला शाळेच्या मुख्याध्यापिका जस्सी जयसिंग, मुख्याध्यापक जस्सूराज अंगदुराई, स्कूल कॉर्डिनेटर आकांक्षा सवाने, वर्गशिक्षिका सुजाता साळवी ह्यांनी देखील मुलांबरोबर खड्डे बुजवण्यात मोलाचे सहकार्य केले. यावेळी  क्रीडाशिक्षक सुनील साठे उपस्थित होते.

या विद्यार्थ्यांचे वाहनचालकांनी,पालकांनी कौतुक केले .

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!