योजनेचे स्वरुप
पाण्याची कार्यक्षमता वाढवून पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक उत्पादन मिळवणे व सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्र वाढवणे हा योजने मागचा उद्देश आहे.
योजनेच्या अटी
◆शेतकऱ्यांच्या नावे मालकी हक्काचा ७/१२ व ८अ उतारा असावा.
◆सूक्ष्म सिंचन घटकाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध असावी.
◆सूक्ष्म सिंचन संच घटकाचे आयुर्मान ७ वर्षे करण्यात आले आहे. ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेतला आहे अशा लाभधारकास ७ वर्षानंतर पुन्हा सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेता येईल.
◆ शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर स्वतःची नोंदणी करुन आधार क्रमांकाचे प्रमाणिकरण करणे बंधनकारक आहे.
आवश्यक कागदपत्रे
● अनुसूचित जाती व जमाती यांच्यासाठी सवर्ग प्रमाणपत्रे.
●पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असल्याबाबतचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
●सूक्ष्म सिंचन संच खरेदी केल्यानंतर शेतकरी हमी पत्र, देयकाची मूळ प्रत आणि कंपनी प्रतिनिधीने तयार केलेला सूक्ष्म सिंचन आराखडा व प्रमाणपत्र.
योजनेअंतर्गत लाभ
अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ५५ टक्के व इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान देय राहील. अर्थसाहाय्य- केंद्र हिस्सा ६० टक्के व राज्य हिस्सा ४० टक्के असे आहे.
ऑनलाईन संकेतस्थळ: mahadbtmahait.gov.in
अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उप विभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
Comments are closed