पिंपरी दि. १८(punetoday9news) : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी १३ जुलै पासून  १० दिवसांसाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरात चालु असलेल्या लॉकडाऊनचा पहिला टप्पा संपला असून उद्या रविवारपासून लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरु होत आहे. त्यात स.८ वा.पासून  दु.१२ वा.पर्यंत दूकाने चालू राहतील. 

तर फक्त उद्या रविवार दि. १९ जुलै रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वा. पर्यंत दुकाने खुली ठेेवण्यास  परवानगी देण्यात आली आहे. 

याबाबत आज शनिवारी पिं.चिं. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी नियमावलीबाबतचा आदेश जाहीर केला आहे. त्यानुसार दि. १९ ते २३ याकाळात लॉकडाऊन शिथील करण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.

१. सर्व किराणा दुकान, सर्व किरकोळ व ठोक विक्रेते, इतर सर्व व्यवसाय करणारे व्यापारी दुकाने दि. १९ ते २३/०७/२०२० या कालावधीत सकाळी ०८ ते दुपारी १२ वा. पर्यंत केवळ अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारी दुकाने व त्यांचे ठोक विक्रेते यांची दुकाने सुरु राहतील, इतर सर्व दुकाने व अस्थापना बंद राहतील.

२. दि १९ ते २३/०७/२०२० या कालावधीत शेतकरी आठवडी बाजार तसेच भाजी व फळांची विक्री सकाळी ०८ ते दुपारी १२ वा. पर्यंत चालु राहील.

३. मटन, चिकन, अंडी, मासे इत्यादीची विक्री दिनांक १९ ते २३/०७/२०२० या कालावधीत सकाळी ०८ ते दुपारी १२ वा. पर्यंत चालु राहतील.

परंतु लॉकडाऊन शिथील होताना दुकान व बाजारात होणाऱ्या संभाव्या गर्दीचा विचार करता कोविड १९ चे संभाव्य संक्रमण टाळण्यासाठी फक्त दि. १९  रोजी उपरोक्त अनुक्रमांक १ ते ३ मधील सर्व प्रकारचे व्यवसाय सकाळी ८ ते सा. ६ वा. पर्यंत चालु राहतील.

तसेच दिनांक २० ते २३/०७/२०२० पर्यंत उपरोक्त अनुक्रमांक १ ते ३ मधील सर्व प्रकारचे व्यवसाय सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत चालु राहतील.

23 जुलैपर्यंत या गोष्टी बंदच राहतील

झोमॅटो, स्वीगी व तत्सम ऑनलाईन पोर्टलवरुन मागविले जाणारे खाद्यपदार्थ.  केश कर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर इत्यादी आस्थापना व सेवा संपूर्ण बंद राहतील.खाजगी कार्यालये,आस्थापना संपूर्णतः बंद राहतील. उपहारगृह लॉज, हॉटेल,  सार्वजनिक ठिकाणी,रस्त्यावर मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक, जॉगिंग, शारीरिक व्यायाम करण्यास मनाई राहील. मद्य विक्री बंद राहील.

Comments are closed

error: Content is protected !!