पोलिसांची ड्युटी आठ तासांची व्हावी; उमेद सुथार यांची पत्रकाद्वारे मागणी
पुणे,दि. २५( punetoday9news):- महाराष्ट्र राज्य शासनाने पोलिसांची ड्युटी आठ तासांची करावी अशी मागणी पोलीस मित्र संघटना, नवी दिल्ली, भारतचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष उमेद सुथार यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
ते बोलताना पुढे म्हणाले, पोलिसांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची विचार करण्याची गरज आहे. पोलिसांना ही योग्य विश्रांतीची गरज आहे.
महाराष्ट्र पोलीस खात्यातील पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी व पोलीस दलातील महिला, अधिकारी, कर्मचारी वर्ग अतिशय कर्तव्यदक्ष आहे. जीवाची परवा न करता आपले कर्तव्य बजावत असतात. कुटुंबासोबत कुठलाही सण किंवा इतर सुखाचा वेळ ते देऊ शकत नाही. पोलिसांना 24 तास जनतेच्या सेवेसाठी सज्ज राहावे लागते.
सामाजिक क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे पोलीस दलातील अनेक अधिकारी, कर्मचारी वर्ग संपर्कात आहेत. त्यांचं काम जवळून पाहिले आहे. यासाठी त्यांच्या मदतीसाठी अनेक पथकेही स्थापन केली आहे. आज पोलिसांमुळे जनता सुरक्षित आणि सुखरूप आहे. पण पोलिसच असुरक्षित आहे. त्यामुळे पोलिसांची ड्युटी आठ तासांची असावी अशी, मागणी उमेद सुथार यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
Comments are closed