पुणे,दि. २६( punetoday9news):- पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे विधी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. रंजना पाटील यांनी भूषवले. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. शिवाजी बिबे यांनी केले.महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून समाजाप्रती आपली जबाबदारी आपण सर्वांनी राष्ट्राची सेवा करून पार पाडली पाहिजे असे सांगण्यात आले . त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व व या योजनेमध्ये राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. महाविद्यालयातील जोस्ना गायकवाड आणि पवन जाधव या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजना आणि व्यक्तिमत्व विकास याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष सुतार यांनी केले. आभार प्रा. मयूर कोळेकर यांनी व्यक्त केले
Comments are closed