सांगवी : सांगवी येथील डॉक्टर आदित्य ॲडव्हान्स डेंटल हॉस्पिटलचे संचालक व दंत रोग चिकित्सक डॉ. आदित्य पतकराव यांची अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटनेच्या पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्षपदी निवड झाली. डॉ. आदित्य यांना याआधी लंडन पार्लमेंटचा “जागतिक एक्स्लन्स २०१९” हा पुरस्कार मिळाला आहे. अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटन ही भारत सरकारची मान्यताप्राप्त संघटना असून नवीन ग्राहक कायदा २० जुलैपासून देशभर लागू होत असतांना पिंपरी-चिंचवडच्या अध्यक्ष पदी डॉ. आदित्य यांची निवड महत्वपूर्ण मानली जात आहे. ग्राहक तक्रारींची वाढलेली व्याप्ती, ग्राहक न्यायालयाने दिलेले वाढीव अधिकार व केवळ दंड किंवा भरपाई ऐवजी सदोष किंवा बनावट उत्पादनाबद्दल उत्पादक व विक्रेत्यास तुरुंगवास, फसव्या अथवा अतिरंजित जाहिरातीबद्दल उत्पादकता प्रमाणे ती जाहिरात करणाऱ्या सेलेब्रिटिंनाही या नवीन कायद्याच्या कक्षेत आणले जाणार आहे. दाखल दाव्याचा निकाल देण्यापूर्वी प्रकरण मध्यस्थीने सोडवण्याचा प्रयत्न करणे हा या कायद्याची महत्वाची बाब असणार आहे. अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटन यांच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक करणे, फसव्या जाहिराती करणे, भेसळयुक्त उत्पादन करणे, बनावट उत्पादन करणे इत्यादी गोष्टींवर अंकुश ठेवता येणार आहे़. तसेच या गोष्टींना प्रोत्साहन करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
Comments are closed