सांगवी, दि.३० ( punetoday9news ) :- पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवीत परिसरात  पेट्रोल चोरणारी टोळी सक्रिय असून परिसरातील नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत . नवी सांगवीतील समर्थनगर मधील रेणुका रेसिडेन्सी आणि मोनाली पॅलेस सोसायटीमधील  cctv मध्ये चोरटे कैद झाले आहेत . 

सोसायटीतील  चेतन तारू (अध्यक्ष- भाजपा युवामोर्चा पिं.चिं. प्रभाग क्र.३१) व  साई कोंढरे सामाजिक कार्यकर्ते  आणि स्थानिक नागरिक यांनी याबाबत माहिती दिली.  पिंपरी चिंचवड मध्ये यापूर्वी चिंचवड, भोसरी, पिंपरी मध्ये अशा घटना उघडकीस आल्या आहेत मात्र आता नवी सांगवीतही दि. २८. रोजी मध्यरात्री  २.३० ते ३ च्या सुमारास  समर्थ नगर सर्व्हे.नं ७८/७९ ग्राहक डायनिंग हॉल समोरील परिसरात रेणुका रेसिडेन्सी आणि मोनाली पॅलेस मधून एकूण ८ दुचाकींमधून पेट्रोल चोरी झाली आहे .

पेट्रोल चोरीची घटना उघडकीस आल्याने परिसरातील नागरिक धास्तावले आहेत. तसेच लवकरात लवकर या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.

 

 

 

 




 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!