पुणे दि. १( punetoday9news):- अन्न व औषध प्रशासनाने दौंड तालुक्यातील दापोडी व केडगाव येथील तीन गुळ उत्पादकावर कारवाई करुन सुमारे ५ लाख ३३ हजार ८७० रुपये किंमतीचा भेसळयुक्त गुळ व साखर जप्त केली.

अन्न व औषध प्रशासनातर्फे मुदतबाह्य चॉकलेट, भेसळयुक्त गुळ व साखर वापरणाऱ्या गुळ उत्पादकावर कारवाई करण्यात येत आहे. दापोडी येथील मे. सचिन गुळ उद्योग व मे.सुपर स्टार गुळ उद्योगाचे मालक सचिन मोहिते या गुळ उत्पादकावर धाडी टाकुन धाडी टाकुन भेसळयुक्त गुळ व साखरेचे नमुने घेऊन उर्वरित ५१ हजार ३० रुपये किंमतीचा सुमारे १ हजार ४५८ किलो गुळ व ५१ हजार रुपये किंमतीची १ हजार ५०० किलो साखरेचा साठा जप्त करण्यात आला होता.
केडगाव येथील मे. समर्थ गुळ उद्योगाचे मालक अमोल गव्हाणे या गुळ उत्पादकावर धाडी टाकुन भेसळयुक्त गुळ व साखरेचा एक नमुना घेऊन उर्वरित ३ लाख ७२ हजार ६४० रुपये किंमतीचा सुमारे १० हजार ९६० किलो गुळ व ५९ हजार २०० रुपये किंमतीची १ हजार ८५० किलो साखर जप्त करण्यात आली आहे.

याबाबत प्रशासनास मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत असल्याने प्रशासनामार्फत लवकरच विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. याप्रकरणी गैरप्रकार आढळून येणाऱ्या गुऱ्हाळ घरावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. सणासुदीच्या काळात ग्राहकांची फसवणूक करुन कमी दर्जाचे अन्न पदार्थ विक्री करणाऱ्याविरुद्ध १८०० २२२ ३६५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी. जिल्ह्यातील सर्व गुऱ्हाळ चालकांनी अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ या कायद्याअंतर्गत आवश्यक असलेला परवाना प्राप्त करुनच गुळ उत्पादन करण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सहायक आयुक्त संजय नारागुडे यांनी केले आहे.

 




 

 

Comments are closed

error: Content is protected !!