पुणे, दि. २( punetoday9news):- पुणे शहरातील बाह्य वाहतूक वाढून होत असलेल्या ट्राफिक जॅम वर उपाय म्हणून चांदणी चौक पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी आज पहाटे 600किलो स्फोटक वापरून नियंत्रित स्फोट घडवला खरा पण त्यात संपूर्ण पूल पडला नसल्याचे दिसत आहे.
त्यावर प्रतिक्रिया देताना ब्लास्टिंग अधिकारी आनंद शर्मा यांनी एका वर्तमानपत्रास सांगितले की, स्फोटानंतर पूल खिळखिळा झाला आहे. स्फोट १००% यशस्वी झाला आहे, स्टील मध्ये पॅक केला असल्याने पूल कोसळला नाही, पण स्टील काढताच सांगडा पडेल.
Comments are closed