पिंपळे गुरव,दि.३( punetoday9news):- नवी सांगवीतील कृष्णाचौक येथील विद्यानगर महिला मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. मंडळाचे हे तेरावे वर्ष आहे. यानिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


विद्यानगर महिला मंडळ तसेच महालक्ष्मी महिला संस्था यांच्या संयुक्त विद्यमातून नवरात्र उत्सवानिमित्त भव्य मंडप उभारण्यात आला आहे. मुख्य रस्त्यांवर कमानी उभारून त्यावर विद्युत रोषणाईच्या रंगीबेरंगी माळा सोडण्यात आल्या आहेत. मंदिरासमोरील आकर्षक रांगोळी प्रत्येक भाविकांच्या मनास भुरळ घालते . मंडपात घटस्थापनेच्या दिवशी दुर्गा माता वाघावर बसून आरूढ झालेली मनमोहक मूर्तीची स्थापना केली आहे. तसेच आकर्षक फुलांची सजावट करून गजराज उभारण्यात आले आहेत .


देवीची नवरात्र उत्सवात नित्यनियमाने विधिवत पूजा करण्यात येते. कुंकुमार्चन विधी, भोंडला, सोक्त पठण, होमहवन, महाआरती, भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम मनोभावे पार पाडले जात आहेत. कोजागिरी पौर्णिमेला महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सव साधेपणाने साजरे करण्यात आले होते. यंदा मात्र निर्बंधमुक्त असल्याने ढोल ताशांच्या गजरात पारंपारिक पद्धतीने देवीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.

नवरात्र उत्सवात विद्यानगर महिला मंडळाच्या अध्यक्षा नंदा अहिरे, उपाध्यक्ष कल्पना मचाले, शैलजा येवले, वृषाली ढावरे, सविता चौधरी, अर्चना जाधव आदी परिसरातील महिला गुण्या गोविंदाने एकत्रित येऊन नवरात्र उत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. येथील सर्व महिला दररोज देवीसमोर विविध रंगांच्या साड्या परिधान करून तसेच पारंपरिक वेशभूषेत उपस्थित राहून सायंकाळी गरबा, दांडिया यासारखे खेळ खेळत थिरकत्या गाण्यांच्या ठेक्यांवर नृत्य सादर करून परिसरातील उपस्थितांची मने जिंकतात.

विद्यानगर महिला मंडळाचे यंदा नवरात्र उत्सव साजरा करण्याचे तेरावे वर्ष आहे. परिसरातील सर्वच महिला उत्साही असल्याने मनोभावे देवीचा नवरात्र उत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी दरवर्षी कटिबद्ध असतात. सर्व महिलांचे मोलाचे सहकार्य लाभत असते. धार्मिक कार्यक्रम तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, गरबा, दांडिया, भोंडला पारंपरिक खेळ मंडळाच्या वतीने राबविण्यात येतात. मंडळाच्या वतीने दरवर्षी गोरगरीब, गरजूंना आर्थिक मदत तसेच अन्नधान्य किटचे वाटप करण्यात येत असते.
नंदा अहिरे, अध्यक्ष विद्यानगर महिला मंडळ.

 

 

 

 




 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!