● प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन.
● नवी सांगवी,पिंपळे गुरव, सांगवी व परिसरातील नागरिकांचा महाभोंडला व रावण दहनाच्या कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद.
● तीन वर्षाच्या लहान मुलांपासून ते ऐशी वर्षाच्या आजीपर्यंतच्या महिलांचा सहभाग.
सांगवी, दि. ७( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवीत नवरात्र व दसऱ्याच्या निमित्ताने आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वतीने महाभोंडला, दांडिया व रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या रावण दहनाच्या कार्यक्रमा निमित्त भव्य असा ५१ फुटी दहा तोंडी रावण तयार करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या वेळी प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन झाले.
त्यानंतर हजारो महिलांनी पारंपारिक भोंडला व दांडियाच्या गाण्यांवर ठेका धरला . तीन वर्षाच्या लहान मुलांपासून ते ऐशी वर्षाच्या आजीपर्यंतच्या महिलांनी सहभाग नोंदवला. या नंतर रावणाचे दहन करण्यात आले. रावन दहनाचा क्षण आपल्या मोबाईल मध्ये टिपण्यासाठी हजारो नागरिकांचा जनसागर लोटला.
या कार्यक्रमाचे नियोजन शंकर पांडुरंग जगताप, माऊली जगताप यांनी केले होते.
या कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड मधील भाजपाचे नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी व हजारोच्या संख्येने कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
Comments are closed