● दिलेले पुरावे बनावट कागदपत्र मानून जप्त.

● ठाकरे व शिंदे दोन्ही गटांना धनुष्यबाण चिन्ह व शिवसेना नाव वापरता येणार नाही. 

● आयोगाकडून तात्पुरता निकाल. 

मुंबई, दि. ८ ( punetoday9news):- शिवसेना पक्षासाठी अस्तित्वाची लढाई असताना सुप्रीम कोर्टानंतर निवडणूक आयोगाकडूनही निराशाजनक निकाल आल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. 

शिवसेना कोणाची यासाठी दोन्ही गटाकडून दावे प्रतिदावे करण्यात येत असताना कोर्टातील निकाल हा निवडणूक आयोगाकडे गेल्याच्या नंतर निवडणूक आयोगानेही यावर तात्पुरत्या स्वरूपात निकाल देत शिवसेना नाव व निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे दोन्ही गटांना वापरण्यास मज्जाव केला आहे.

ठाकरे गट या निर्णया विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची माहिती समोर येत आहे तसेच उद्या ठाकरे गटाकडून या विषयावर चर्चा होणार आहे.

खासदार अरविंद सावंत या निकालावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, निवडणूक आयोगाकडून पुराव्याची छाननी न करता थेट निकाल देण म्हणजे लोकशाहीच्या मुळावर घाव घालण्याचा प्रकार आहे. 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!