पुणे, दि. ९ ( punetoday9news):- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ आणि फर्ग्युसन महाविद्यालय (स्वायत) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंतर महाविद्यालयीन ‘स्वररंग’२०२२ स्पर्धेत विधी महाविद्यालया मधील सहा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या स्पर्धेमध्ये एकपात्री अभिनय कला प्रकारात राणे तेजस्विनी हिला तृतीय पारितोषिक सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रंजना पाटील यांनी तिचे व सर्व स्पर्धकांचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमांमध्ये पवन जाधव,उमिया खानूम, हर्षवर्धन देशमुख ,आदित्य कतुले, शिवराज आणि स्फूर्ती तीकुठे यांनी सहभाग घेतला. या सांस्कृतिक उपक्रमासाठी प्राचार्य डॉ. रंजना पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सांस्कृतिक अधिकारी प्रा. सनोबर काझी, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.संतोष सुतार सर्व प्राध्यापक वर्ग यांनी परिश्रम घेतले.
Comments are closed