पिंपळे गुरव,दि. १०( punetoday9news):- पिंपळे गुरव येथील गावठाण परिसरातील तुळजाभवानी मातेच्या मंदिर परिसरात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. 

 

भवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड  गर्दी झाली होती. पिंपळे गुरव मधील तुळजाभवानी मातेचा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. कोजागिरी पौर्णिमेला महाआरती तसेच महाप्रसाद वाटप करून उत्साहाची सांगता करण्यात आली.

तुळजाभवानी मंदिरात कोजागिरी पौर्णिमेला पहाटे देवीची विधिवत पूजा आरती करण्यात आली. सायंकाळी आठ वाजता संबळ वाद्यावर मंदिरातील देवीची महाआरती चिंचवड विधानसभा भाजपा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्या हस्ते घेण्यात आली. असे माजी नगरसेवक शशिकांत कदम यांनी सांगितले . 

याप्रसंगी माजी महापौर शकुंतला धराडे, माजी नगरसेवक शशिकांत कदम, माजी स्वीकृत नगरसेवक महेश जगताप, उद्योजक नवनाथ जांभुळकर, अजय दूधभाते तसेच कार्यकर्ते, भाविक उपस्थित होते.


कोजागिरी पौर्णिमेनिमित्त भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी मंदिरात सकाळ पासूनच रांगा लावल्या होत्या. सायंकाळी सहा वाजल्यापासुन रात्री अकरा वाजेपर्यंत पिंपळे गुरव, सांगवी, नवी सांगवी परिसरातून आलेल्या हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

 

 

 




 

Comments are closed

error: Content is protected !!