पुणे, दि. १२( punetoday9news):- भिवंडीहून भाविक भीमाशंकरला दर्शनासाठी हे निघाले होते. बसमध्ये 23 महिला, 3 पुरुष असे 26 भाविक आणि चालक बसमध्ये होते. सकाळी साडे सहाच्या सुमारास घोडेगावच्या पुढे दोन किलोमीटर अंतरावर मिनीबस पोहोचली असता ही घटना घडली.

समोरुन खेड-राजगुरुनगरकडे निघालेल्या एसटी चालकाला बसच्या इंजिनमधून धूर येत असल्याचे दिसून आले. एसटी चालकाने बसला थांबवून चालकाला याबाबत सांगितले. हे ऐकून चालकाने तातडीने बस थांबवली आणि सर्व भाविकांना गाडीतून उतरण्यास सांगितले. सुदैवाने सगळे प्रवासी बसमधून उतरताच पुढच्या काही क्षणात मिनी बसने पेट घेतला आणि बघता-बघता बस जळून खाक झाली. यानिमित्ताने खाजगी बसच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे

 




Comments are closed

error: Content is protected !!