पिंपरी, १२( punetoday9news):- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या सुचनेनुसार, १८ वर्ष वयोगटावरील सर्व महिला, माता, गरोदर महिला यांची सर्वांगीण तपासणीसाठी दि. २६ सप्टेंबर २०२२ रोजी पासून “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” हे अभियान राबविण्यात येत आहे.
आयफोन पेक्षा गुगल पीक्सल7 फोनला वाढतेय मागणी.
माता सुरक्षित तर घर सुरक्षित” या मोहिमे अंतर्गत आज दि. १२ ऑक्टोंबर २०२२ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, पिंपरी येथे महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये रुग्णालयामधील महिला अधिकारी व कर्मचारी तसेच १८ वर्षावरील युवती, गरोदर महिला, माता अशा ५२५ लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली.
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त पिंपळे गुरव मधील तुळजाभवानी मंदिरात महाआरती.
सदर महा आरोग्य शिबिरास आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. उज्वला आंदुरकर, उप वैद्यकीय अधिक्षक डॉ. मनिषा सुर्यवंशी, जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार, डॉ. वर्षा डांगे, भूलतज्ञ डॉ. मारुती गायकवाड, रेडिओलॉजिस्ट डॉ. रसिका वाघमारे, शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. चैताली इंगळे, पी.एच.एन. यशस्वीता बाणखेले व कर्मचारी उपस्थित होते.
“माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अशी संकल्पना घेऊन विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येत आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालय स्तरावर राबविण्यात येणारी विविध आरोग्य शिबिरे व उपक्रमांतर्गत युवती. गरोदर महिला आणि मातांची आरोग्य तपासणी करून प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रत्येक रुग्णालय झोन अंतर्गत तपसणी शिबिरे घेण्यात येत असुन आजारी माता व महिलांना मनपाच्या रुग्णालयामध्ये उपचाराकरीता संदर्भित करण्यात येत आहे. यादरम्यान नवविवाहित महिलावर विशेष लक्ष देण्यात येत आहे. सदर शिबिरामध्ये सोनोग्राफी तपासणी आणि कुटुंब कल्याण बाबत ही समुपदेशन करण्यात येत आहे. तसेच आयुष्यमान भारत- प्रधानमंत्री आरोग्य सुरक्षा योजनेअंतर्गत ABHA Card काढण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
तरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत सर्व माता व महिलांना अवाहन करण्यात येते की, “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” या अभियानांतर्गत दि. २६ ऑक्टोबर, २०२२ पर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयांतर्गत तसेच रुग्णालय कार्यक्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या उपक्रम व शिबिरांचा लाभ घ्यावा. असे आरोग्य विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
Comments are closed