मराठी विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने ‘मुक्त वाचन व जाऊ कवितेच्या गावा’ या कार्यक्रमाचे आयोजन

सांगवी,दि. १६( punetoday9news):- पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयात मराठी विभाग व ग्रंथालय
विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. १५ ऑक्टोबर २०२२ रोजी माजी राष्ट्रपति डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. डॉ. स्वप्निल चौधरी (दंगलकार) हे होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे होते.
याप्रसंगी डॉ. स्वप्निल चौधरी यांनी ‘जाऊ कवितेच्या गावा’ हा कार्यक्रम सादर करत विद्यार्थ्यांचे उदबोधन केले. याप्रसंगी त्यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे संस्थापक स्वर्गीय बाबूरावजी घोलप साहेब यांना अभिवादन केले. कार्यक्रम सादर करताना प्रेम कविता, सामाजिक कविता, शेतकरी प्रश्न आदी महत्वाचे विषयावर त्यांनी कविता सादर करून विद्यार्थी व विद्यार्थिनी संबोधित केले.

आयुष्यात प्रत्येक गोष्टीला किती महत्त्व द्यायचं हे प्रत्येकाला कळायला हवं. नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिका, समाजप्रबोधनातील त्यांचे योगदान ‘चला दंगल समजून घेऊ’ या कवितेतून करून दिले. या कवितेमध्ये राजकारणी आणि सर्व सामान्य माणसांच्या भाव भावनांचे मिश्रण दिसून आले. त्यांच्या मते कविता प्रामाणिकतेसाठी असते. मी जे पाहिले ते कवितेत मांडले. त्यांनी आपल्या सादरीकरणात आत्महत्येचा जन्म या कवितेत आत्महत्या करणाऱ्या बापची व्यथा मांडणारा गण्या, शाळेतलं प्रेम आदी कविता सादर करून फुगे वाल्याची, गोष्ट बेडकाची गोष्ट यातून मानवी जीवनातील अंतिम सत्याचा परिचय करून दिला. पुस्तक , गुरु व आईवडील हे आपले खरे सोबती असून त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण वाटचाल केल्यास आपण आपल्या ध्येय पर्यत पोहचू शकतो. असा वडिलकीचा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. बाळकृष्ण झावरे यांनी वाचन प्रेरणा दिनाचे महत्व सांगून डॉ. स्वप्निल चौधरी यांच्या संवेदनशील कवितांचे कौतुक केले. सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. विठ्ठल नाईकवाडी यांनी केले पाहुण्यांचा परिचय डॉ. विजय बालघरे यांनी करून दिला.
सदर कार्यक्रमाचे संयोजन मा. प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुवर्णा खोडदे, डॉ. विठ्ठल नाईकवाडी, डॉ. विजय बालघरे यांनी केले. सदर कार्यक्रमास कला शाखा समन्वयक प्रो. डॉ. अर्जुंन डोके, सर्व विभाग प्रमुख, सहकारी प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे तांत्रिक साहय्य सनी पावले यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सुवर्णा खोडदे यांनी केले. तर आभार डॉ. वंदना पिंपळे यांनी मानले.

 

 

 




 

 

Comments are closed

error: Content is protected !!