● नागरिकांची प्रचंड गर्दी, तरूणाई आणि महिलांनी धरला ठेका.
● सुमधूर गायनाने श्रोते सुखावले.
पिंपरी, दि. २३( punetoday9news):- आमदार लक्ष्मण जगताप व माजी नगरसेवक शंकर जगताप मित्र परिवार तसेच भाजपचे सर्व माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने पिंपळेगुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानातील हिरवळीवर रविवारी (दि. २३) दिवाळी पहाट रंगली.
बासरी-व्हायोलिन-तबला कलाकारांची जुगलबंदी आणि अवीट गोडीच्या गाण्यांच्या फराळाचा पिंपळेगुरवमधील रसिकांनी भल्या पहाटे आनंद लुटला. अनेक गाण्यांवर तरूणाईने ठेका धरला. त्यामुळे मोठ्यांनाही ताल धरण्याचा मोह आवरला नाही. विशेषतः महिलांमध्ये अधिक नृत्य, गाणी आणि जल्लोषात ही पहाट रंगत गेली.
दिवाळीतील पहिल्याच दिवाळी पहाटच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी व प्रतिभा प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा अश्विनी जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती राजेंद्र राजापुरे, भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख व माजी नगरसेवक शंकर जगताप, माजी नगरसेवक सागर आंगोळकर, अंबरनाथ कांबळे, शशिकांत कदम, संतोष कांबळे, माजी प्रभाग स्वीकृत सदस्य महेश जगताप, माजी नगरसेविका ममता गायकवाड, उषा मुंढे, शोभा आदियाल, माधवी राजापुरे, वैशाली जवळकर, सामाजिक कार्यकर्ते माऊली जगताप, संजय जगताप, नवनाथ जांभुळकर, सखाराम रेडेकर, गोपी पवार, साई कोंढरे, राहुल जवळकर, शिवाजी निम्हण, शिवाजी कदम, सुरेश तावरे, ज्ञानेश्वर खैरे, देविदास शेलार, भाजपच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षा उज्ज्वला गावडे, पल्लवी जगताप, उर्मिला देवकर, विजया देवकर, कावेरी जगताप, शोभा जांभुळकर, कमल गोंडाळकर आदी उपस्थित होते.
उद्यानाच्या हिरवळीवर रसिकांची गर्दी, दिव्यांचा लखलखाट, आकाश कंदिलाची सजावट आणि दुसरीकडे सुरेल गीतांनी दिवाळीची पहिली पहाट पिंपळेगुरवकरांच्या ह्दयात घर करून गेली. या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक त्यागराज खाडिलकर, संज्योती जगदाळे, स्वप्ना काळे, राजू जाधव यांनी भक्तीगीते, भावगीतांसह अनेक मराठी आणि हिंदीतील सुरेल व मधुर गाणी सादर केली. या गाण्यांच्या सुरांनी पिंपळे गुरवचे रसिक मंत्रमुग्ध झाले. अनेक गाण्यांवर तरूणाई थिरकली. हा जल्लोष पाहून मोठ्यांनाही ताल धरण्याचा मोह आवरला नाही. विशेषत: महिलांनी धरलेल्या जल्लोषपूर्ण ठेक्याने दिवाळी पहाट रंगतदार बनली. नृत्य, गाणी आणि जल्लोषात ही पहाट रंगत गेली.
Comments are closed