पुणे, दि. २३( punetoday9news):- जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या निर्देशानुसार सिंहगड भागातील कातकरी वस्ती येथील आदिवासी बांधवांना
अन्नधान्य वितरण अधिकारी श्रीमंत पाटोळे यांच्या उपस्थितीत नवीन शिधापत्रिका व ‘आनंदाचा शिधा’ दिवाळी किट वाटप करण्यात आले.
नवीन शिधापत्रिका व दिवाळी किट मिळाल्याने आदिवासी बांधवांसाठी दिवाळीचा सण विशेष ठरला. या सर्व नागरिकांनी प्रशासनाला धन्यवाद दिले.
यावेळी परिमंडळ-म विभागाचे पुरवठा निरीक्षक चांगदेव नागरगोजे, डोणजे गावचे पाटील दिलीप पायगुडे, रास्तभाव दुकानदार नंदू जावळकर उपस्थित होते.
Comments are closed