सांगवी ,दि. २६ ( punetoday9news):- नवी सांगवी येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस प्रशांत सपकाळ यांच्या वतीने दिवाळीनिमित्त विविध रंगीबरंगी पणत्यांचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत समाजासाठी आपण काही तरी देणे लागतो ही भावना मनात ठेऊन हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातील सर्व पक्ष श्रेष्ठी, आजी माजी महापौर, पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक, मित्र परिवार, पत्रकार, पोलीस बांधव, महापालिका शाळा, खाजगी शाळा, शिक्षकवृंद, आरोग्य कर्मचारी, भाजी विक्रेते, व्यावसायिक, दुकानदार आदींना दिवाळीनिमित्त रंगीबेरंगी पणत्यांचे वाटप करण्यात आले.
शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर योगेश बहल, माजी महापौर मंगला कदम, रविकांत वरपे, युवक अध्यक्ष इम्रान शेख, महिला अध्यक्ष कविता अल्हाट, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, विशाल काळभोर, महिला निरीक्षक शितल हगवणे, नगरसेविका वैशाली काळभोर, पिंपरी विधानसभा अध्यक्ष शाम लांडे, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, कामगार सेल अध्यक्ष किरण देशमुख, कामगार सेल कार्याध्यक्ष युवराज पवार, सतीश दरेकर, विजय लोखंडे, नगरसेवक मयूर कलाटे, नाना काटे, विक्रांत लांडे यांनाही पणत्यांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी युवा नेते प्रशांत सपकाळ म्हणाले समाजातील सर्व घटकांसोबत दिवाळी साजरी करण्याचा तसेच सर्वाच्या घरात पणती रूपात आनंददायी प्रकाश पसरावा. यासाठी केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न होता. दिवाळीत सर्वांच्या घरात या पणती लावून सर्वांची दिवाळी उजळून आनंदोत्सव साजरा व्हावा ही सदिच्छा .
Comments are closed