पिंपरी, दि. २७( punetoday9news):-  आमदार लक्ष्मण जगताप व माजी नगरसेवक शंकर जगताप मित्र परिवार तसेच भाजपचे सर्व माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने पिंपळेगुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानातील हिरवळीवर रविवारपासून (दि. २३) चार दिवस रामप्रहरी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुमधुर गीतांच्या मेजवानीने चार दिवस दिवाळी पहाट रंगतदार राहिली. पिंपळेगुरव आणि सांगवीतील नागरिकांनी पांरपारिक वेशभूषेत या दिवाळी पहाट कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. सलग दोन वर्षे कोरोना संकटाच्या दिवाळी सण साजरा करता न आल्याच्या पार्श्वभूमीवर रंगलेल्या या दिवाळी पहाटची मैफल पिंपळेगुरवकर आणि सांगवीकरांसाठी अविस्मरणीय ठरली.

दिवाळी सण म्हटले की रंगीबेरंगी रोषणाई, रांगोळी, पणत्या व फराळ आलेच. याव्यतिरिक्त दिवाळी पहाट हा कार्यक्रम दिवाळी सणाची मनाला खरी ओळख करून देतो. रामप्रहरी सप्तसूर आपल्या कानी पडल्यावर खरोखरच मन अगदी प्रसन्न होऊन जाते. दिवाळीत पिंपळेगुरवकर आणि सांगवीकरांचे मन प्रसन्न करण्याच्या उद्देशाने आमदार लक्ष्मण जगताप व माजी नगरसेवक शंकर जगताप मित्र परिवार तसेच भाजपचे सर्व माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने पिंपळेगुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानात रविवारपासून (दि. २३) बुधवारपर्यंत (दि. २६) सलग चार दिवस संगीतमय दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी व प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या संस्थापिका अश्विनी जगताप यांच्या हस्ते चार दिवसांच्या या दिवाळी पहाट कार्यकमाला सुरूवात झाली. आज या कार्यक्रमाचा समारोप झाला.

सलग चार दिवस भल्या पहाटे बासरी-व्हायोलिन-तबला तसेच कलाकारांची जुगलबंदी आणि अवीट गोडीच्या गाण्यांच्या फराळाचा पिंपळेगुरव आणि सांगवीमधील रसिकांनी आनंद लुटला. प्रसिद्ध गायक त्यागराज खाडिलकर, राधा खुडे, ममता नेने, योगिता गोडबोले, नितीन कदम, संज्योती जगदाळे, स्वप्ना काळे, राजू जाधव, रविंद्र खोमणे, सायली टाक, मनीष तुम्बरे, गणेशकुमार, अश्विनी, शोभा कुलकर्णी, आकाश कुंभार यांनी हिंदी आणि मराठीतील बहारदार व सुरेल गीते सादर करून पिंपळेगुरवकर आणि सांगवीकरांना मंत्रमुग्ध केले. भक्ती आणि भावगीतांच्या सुमधुर मेजवानीने दिवाळी पहाट रंगतदार राहिली. विशेषतः प्रत्येक दिवशी “पुढ बाई रंग नंग रंग नंग हलगी वाजती” आणि “चंद्रमुखी”च्या गाण्यावर लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक अक्षरशः थिरकले. दोन वर्षे कोरोनाचे संकट सर्वांनी सोसले. या संकटातून बाहेर पडत साजरी झालेली यंदाची दिवाळी पिंपळेगुरवकर आणि सांगवीकरांसाठी राजमाता जिजाऊ उद्यानातील दिवाळी पहाट कार्यक्रमांमुळे अविस्मरणीय ठरली.

यावेळी प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा अश्विनी लक्ष्मण जगताप, भाजपा चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा उज्वला गावडे, स्थायी समितीचे माजी सभापती राजेंद्र राजापुरे, ममता गायकवाड, माजी नगरसेवक सागर आंगोळकर, अंबरनाथ कांबळे, शशिकांत कदम, माजी प्रभाग स्वीकृत सदस्य महेश जगताप, माजी नगरसेविका उषा मुंढे, आरती चोंधे, शोभा आदियाल, माधवी राजापुरे, वैशाली जवळकर, सामाजिक कार्यकर्ते माऊली जगताप, संजय जगताप, नवनाथ जांभुळकर, सखाराम रेडेकर, गोपी पवार, साई कोंढरे, राहुल जवळकर, शिवाजी निम्हण, शिवाजी कदम, सुरेश तावरे, ज्ञानेश्वर खैरे, देविदास शेलार, पल्लवी जगताप, उर्मिला देवकर, विजया देवकर, कावेरी जगताप, शोभा जांभुळकर, कमल गोंडाळकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक बांधव उपस्थित होते.

 

Comments are closed

error: Content is protected !!