योजनेच्या अटी व शर्ती :-
• कला, वाणिज्य, विधी व शिक्षणशास्त्र शाखेमध्ये पदवी अभ्यासक्रमामध्ये किमान ६० टक्के व विज्ञान शाखेमध्ये पदवी अभ्यासक्रमामध्ये किमान ७० टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
• विद्यार्थांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ७५ हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावे.
• विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
• संबंधित लाभार्थी विद्यार्थी कुठेही पुर्णवेळ नोकरी करणारा नसावा.
• शिष्यवृत्ती घेणारा विद्यार्थी शुल्क माफीच्या सवलतीस पात्र राहील.
• अर्धवेळ अभ्यासक्रमाचा विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र राहणार नाही.
• बी.एड. प्रशिक्षण अभ्यासक्रम तसेच एम.फील व पी.एच.डी व तत्सम अभ्यासक्रमासाठी ही योजना लागू नाही.
• सदर शिष्यवृत्ती मंजूर झाल्यास इतर केंद्र /राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येणार नाही.
• महाराष्ट्र राज्याच्या बाहेर शिकत असलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी या योजनेसाठी अपात्र.
• नियमित उपस्थिती ७५ टक्के असणे आवश्यक आहे.
• नूतनीकरणासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षी किमान ५० टक्के गुण आवश्यक.
• नूतनीकरणासाठी विद्यार्थाने मागील वर्षीच्या अर्ज ओळख क्रमांकाचा उपयोग करावा.
आवश्यक कागदपत्रे:
• सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले अधिवास प्रमाणपत्र.
• शैक्षणिक वर्षाच्या लगतपूर्वीच्या वित्तीय वर्षांचे संबंधित तहसिलदार अथवा सक्षम अधिकान्याने दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
• मागील वर्षांची गुणपत्रिका.
• नूतनीकरणासाठी उपस्थिती प्रमाणपत्र.
लाभाचे स्वरूप: सदर शिष्यवृत्ती मंजूर झालेल्या विद्यार्थांना प्रतिवर्ष ५ हजार रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येते.
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईनरित्या https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर.
अधिक माहितीसाठी संपर्क: शिक्षण संचालक, उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे
Comments are closed