छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांची माहिती
पुणे,दि.२९( punetoday9news:-
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलन करणारे छत्रपती संभाजीराजे येत्या १ नोव्हेंबर रोजी शेतकरी व कामगारांशी संवाद साधणार आहेत. आगामी महापालिका निवडणुका, तसेच विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वराज्य पक्षाच्यावतीने शेतकरी व कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांनी दिली.
हा मेळावा येत्या १ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पांगरी (ता. सिन्नर) येथील श्री संत हरीबाबा मंदिर परिसरात होणार आहे, या शेतकरी व कामगार मेळाव्याला माजी खासदार तसेच स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमाला छावा मराठा संघटनेचे संस्थापक किशोर चव्हाण, प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर उपस्थित राहणार आहेत. स्वराज्य पक्षाचा शाखा विस्तार करण्याच्या दृष्टीने हा मेळावा महत्वाचा ठरणार आहे.
Comments are closed