पुणे, दि. ३०( punetoday9news):-  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पुणे जिल्हा क्रीडा विभागीय समिती आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालय सांगवी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन मुलींच्या हॉकी स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकाविला .

तसेच आंतर विभागीय हॉकी स्पर्धेसाठी महाविद्यालयाच्या ७ खेळाडूंची निवड झाली.
या विशेष यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार , पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सर्व सन्मानिय पदाधिकारी, महाविदयालयाचे प्राचार्य डॉ.बाळकृष्ण झावरे यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या.

 




 

Comments are closed

error: Content is protected !!