अहमदनगर, दि. ३१( punetoday9news):- ओल्या दुष्काळाने संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार माजला असताना अहमद नगर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर येत असल्याने संतप्त शेतकरी आता पूर्ण हवालदिल झाले आहेत.

अहमदनगर मधील नेवासा येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी चक्क एकरी चारशे रुपये नोंदणी करण्यासाठी पैशाची मागणी केल्यामुळे आता या शेतकऱ्यांनी करायचं काय? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

एकीकडे आलेल्या प्रचंड पावसाने संपूर्ण शेतीचे नुकसान होऊन शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. त्यात या पाहणी करण्या व नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी स्वतः लाज सोडून शेतकऱ्यांकडे लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या गंभीर प्रकाराची दखल घेत यावर सरकार कोणती कारवाई करणार असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

सदर गैरप्रकाराचा न्यूज चॅनेल ने दाखवलेला विडिओ. – 

 

 

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!